Update:  Friday, November 27, 2015 1:00:34 AM IST


| |

मुख्य पान  >>  दैनंदिनी  >>  भविष्य
दैनंदिन भविष्य
मेष
दुपारनंतर नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो.

वृषभ
कौटुंबिक सौख्य लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. महत्त्वाची बातमी समजेल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन
प्रवासाचे बेत टाळावेत. वाहन चालवताना दक्षता हवी. मानसिक अस्वस्थता राहील. दिवस विशेष अनुकूल आहे.

कर्क
मानसिक अस्वस्थता राहील. एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्‍यता आहे. प्रवास टाळावेत. निरुत्साह जाणवेल.

सिंह
अपेक्षित गाठीभेटी पडतील. संततिसौख्य लाभेल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या
नोकरीत उत्तम स्थिती राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. सार्वजनिक कामात उत्साह वाढेल.

तूळ
दुपारनंतरचा दिवस आपणाला विशेष अनुकूल जाणार आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे.

वृश्चिक
महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. वैवाहिक सौख्य लाभेल. तुमचा उत्साह दुपारनंतर कमी होईल.

धनु
वैवाहिक सौख्य लाभेल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. सकाळनंतर तुमचा उत्साह व उमेद विशेष असणार आहे.

मकर
महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

कुंभ
प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. महत्त्वाचे निर्णय दुपारनंतर घ्यावेत. मनोबल उत्तम राहील.

मीन
दैनंदिन कामे यशस्वी होतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. गुंतवणुकीची कामे शक्‍यतो सकाळनंतर करावीत.

आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: