Update:  Monday, April 21, 2014 2:32:11 AM IST


| |

मुख्यपान » मराठवाडा » बातम्या
 
0
 
0
 

लातूरचे रसिक "नक्षत्राचे देणे'मध्ये मंत्रमुग्ध
- - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2013 - 12:00 AM IST

लातूर - येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त म्युझिक इंडिया प्रस्तुत "सूर हे नक्षत्राचे देणे' या कार्यक्रमात स्व. सुधीर फडके यांची अजरामर गाणी सादर करून कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. रविवारी (ता. 19) रात्री हा कार्यक्रम झाला.

दयानंद शिक्षण संस्थेचे सध्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख गायक रवींद्र साठे यांच्या गाण्यांना रसिकांनी टाळ्या वाजवत दाद दिली. पहिल्या भागात बाबूजींनी गायलेली, संगीतबद्ध केलेली व मराठी चित्रपटात माईलस्टोन म्हणून गणली गेलेली गाणी सादर करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरवात रवींद्र साठे व प्रमोद रानडे यांनी "कानडा राजा पंढरीचा' या गाण्याने केली. यानंतर आशा भोसले यांनी गायिलेल्या "जगाच्या पाठीवर' या चित्रपटातील "थकले रे नंदलाला' हे गाणे मेघना सहस्रबुद्धे यांनी सादर केले. प्रमोद रानडे यांनी "देव देवाऱ्यात नाही..', संदीप उबाळे यांनी "तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मजसमीप तीच तूही कामिनी' हे गीत सादर केले. "झाला महार पंढरीनाथ' या चित्रपटातील गाणे रवींद्र साठे यांनी सादर केले. प्रमोद रानडे व संदीप उबाळे यांनी "धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप ओह मुक्‍या भावनांना' हे गीत सादर करून रसिकांची दाद घेतली. "संथ वाहते कृष्णामाई', "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा', "कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे' हे गीत रवींद्र साठे यांनी सादर केली. त्या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. संगीत संयोजन डॉ. नरेंद्र चिपळूणकर यांनी केले. संचलन मंजूषा गाडगीळ यांनी केले, तर महामुनी, डॉ. राजेंद्र दुरुगकर यांनी साथ संगत केली.

 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2014 eSakal.com - All rights reserved.
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: