Update:  Thursday, April 17, 2014 11:50:09 PM IST


| |

मुख्यपान » मुंबई » बातम्या
 
0
 
2
 

डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरोधात गुन्हा
- - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2014 - 02:00 AM IST

मुंबई - सफाई कामगारांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जे. जे. रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरुद्ध आज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात अटक टाळण्यासाठी डॉ. लहाने यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

जे. जे. रुग्णालयातील साफसफाईच्या कामाची पाहणी करताना डॉ. लहाने यांनी आज सकाळी नरेश वाघेला या कामगाराला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. हा प्रकार घडला तेव्हा तेथे तीन सफाई कामगार उपस्थित होते. या प्रकारामुळे सफाई कामगार संतापले आहेत. हा प्रकार कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी डॉ. लहाने यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. या घटनेनंतर काही कामगारांनी "काम बंद' आंदोलन सुरू केले. त्यात त्यांनी अन्य कामगारांनाही काम बंद करण्यास भाग पाडून रुग्णालयाबाहेर नेले. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांच्या मदतीने काम बंद करण्यास भाग पाडणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतरही कामगारांचा राग शांत होत नव्हता. शेवटी भाईंदर येथे राहणारा सफाई कामगार वाघेला आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात धाव घेऊन डॉ. लहाने यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. या वेळी दोनशेहून अधिक कामगारांनी पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्‍यता असल्याने परिमंडळ -1 चे पोलिस उपायुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह सर्व अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले.

या प्रकरणी डॉ. लहाने यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीनंतर त्यांच्यावर ऍट्रासिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी चौकशीनंतर आवश्‍यक ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिसवे यांनी दिली. दरम्यान, सफाई कामगारांशी बोलताना आपण जातीवाचक शब्द वापरले नसल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. ही घटना घडली तेव्हा आपल्यासोबत आणखी तीन जण होते, असाही दावा त्यांनी केला.

 
0
 
2
 

प्रतिक्रिया
स्मिता - शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2014 - 07:50 PM IST
तात्याराव लहानेनी खरंच जातीवाचक शब्द वापरले असतिल असे वाटत नाही .माझी बहिण २०१२ मधे मिरजेच्या वानलेस हॉस्पिटलमधे अतिदक्षता विभागात १५ दिवस ॲडमिट होती .तेंव्हाचा अनुभव असा आहे की नर्सेस आणि डॉक्टर प्रामाणिकपणे रुग्णसेवेत गुंतलेले असत .पण स्वच्छता कामगार रुग्णाच्या नातेवाईकांकडुन पैसे काढण्यात गुंतलेले असत . शिवाय युरीनची पिशवी भरुन वहात असेल तरी हे लोक दुर्लक्ष करत . संडास केलेले बेडपॅन I.C.U. सारख्या ठिकाणीसुध्दा तसेच ठेवलेले असे . या लोकांचा कामचुकारपणा प्रकर्षाने दिसतो. आणि कम्युनिस्ट कामगार संघटना अशा कामचुकार कामगारांना पाठीशी घालण्यात गुंतलेल्या असतात . शेवटी वाट बघुन बघुन बिचार्‍या नर्सिस बेडपॅन टाकत .
 
0
 
0
 

HASAN - शनिवार, 15 फेब्रुवारी 2014 - 12:24 PM IST
नेत्रतज्ज्ञ डॉ लहाने यांच्यावर पुस्तक,- श्रद्धा पेडणेकर - सकाळ वृत्तसेवा मुंबई - जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर लवकरच पुस्तक येत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत डॉ. लहाने यांनी मिळविलेले देदीप्यमान यश अनेकांना प्रेरणादायी ठरले आहे. व्यावसायिक मूल्ये सांभाळतानाच सामाजिक कार्यही उत्तमरीत्या कसे करता येईल, याचे उत्तम उदाहरण डॉ. लहाने यांनी घालून दिले. त्यांचे संघर्षमय जीवन पुस्तकरूपात येत आहे. "डिम्पल प्रकाशन' लहाने यांच्यावरील चरित्र प्रकाशित करणार आहे. "दृष्टिदाता' असे या पुस्तकाचे नाव आहे.खेडेगावात लहाने यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला. या क्षेत्रातील अनुभव या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आले आहेत. प्रतिक्रिया, हा नगण्य चतुर्थ श्रेणी सफाई कामगारलहाने सोडून गेल्यावर,डोळ्याची ऑपरेशन करणार का?DR लहाने महत्वाचे कि हा सफाई कामगार! देशाची अधोगतीची करणे हीच आहेत.नुकतच USA MICROSOFT SATYA NANDELA SARAKHE LAHANE USA GELYAWAR BOMBALAT BASAWE LAGEL.SAFAI KAMAGAR KARIL OPRE
 
10
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2014 eSakal.com - All rights reserved.
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: