Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
 
 

भारतीय हॉकी संघाला ऑलिंपिकचे तिकीट
- वृत्तसंस्था
Sunday, February 26, 2012 AT 09:53 PM (IST)
Tags: sports,   hockey,   olympic,   france
नवी दिल्ली- ऑलिंपिक हॉकी पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यामध्ये फ्रान्सचा 8-1 असा धुव्वा उडवून भारतीय हॉकी संघाने लंडन ऑलिंपिक स्पर्धेत प्रवेश केला. दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडिअमवर रविवारी झालेल्या सामन्यामध्ये अव्वल ड्रॅग फ्लिकर संदीप सिंगने तब्बल पाच गोल केले. आजच्या पाच गोलांसह संपूर्ण स्पर्धेमध्ये संदीप सिंगने 16 गोल केले. सरदार सिंगला "स्पर्धेचा मानकरी' घोषित करण्यात आले.

या सामन्याला प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा लाभला होता. सामन्याच्या सुरवातीपासूनच प्रेक्षकांनी "इंडिया इंडिया'च्या घोषणा देत भारताला जोरदार पाठिंबा दिला होता. संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या संदीप सिंगने पाच गोल करत भारताला जवळपास एकहातीच लंडनवारीचे तिकीट मिळवून दिले. पेनल्टी कॉर्नरवर राखलेली हुकूमत आणि भक्कम बचावामुळे भारतीयांनी फ्रान्सला अजिबात संधीच दिली नाही. रविवारी भारताला सात पेनल्टी कॉर्नर मिळाले. यातील सहा सत्कारणी लावले. यातही, एकट्या संदीप सिंगनेच पाच गोल केले. वीरेंद्र लाक्राने 17व्या मिनिटास गोल करत भारताचे खाते उघडले. सिमॉन मार्टिनने 23व्या मिनिटास फ्रान्सचा एकमेव गोल केला.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 27/02/2012 12:19 AM ek_vachak said:
क्रिकेट बंद करून हॉकी ला पाठींबा द्या
On 26/02/2012 11:49 PM Nilesh Kanhe said:
"Country First" Best of Luck for Landon Olympic
On 26/02/2012 11:48 PM ashu said:
Congrats team India... I request media to publish this news on first page... Chak de
On 26/02/2012 11:37 PM deepak said:
चक दे इंडिया .....
On 26/02/2012 11:21 PM sourabh said:
भारतीय हॉकी संघाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पण लोकांचे प्रेम क्रिकेट वर आहे. काय करणार ...?
On 26/02/2012 10:39 PM manisha tilekar said:
मेडिया अतिशय बेजबाबदार आहे. हॉकीची ही बातमी एकाही पेपरच्या वेबसाईट्वर झळकली नाही. कोणाला काय बोलणार?
On 26/02/2012 09:58 PM manoj said:
हार्दिक अभिनंदन , मीडिया ने ह्याची बातमी दाखवायला हवी होती


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: