Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

पदाधिकाऱ्यांच्या गाड्या प्रशासनाच्या दरबारी
-
Wednesday, January 04, 2012 AT 03:45 AM (IST)

पुणे - महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जमा करून घेण्यास मंगळवारी दुपारपासून प्रशासनाने सुरवात केली. तर यंदा प्रथमच मतदारांच्या सोयीसाठी सोसायट्यांमध्ये व शक्‍यतो तळमजल्यावरच मतदान केंद्र ठेवण्याचे बंधन निवडणूक आयोगाने घातले आहे.

महापालिकेची निवडणूक येत्या 16 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यासाठीची आचारसंहिता मंगळवारी दुपारपासूनच लागू करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जमा करण्याचे काम प्रशासनाने दुपारपासूनच सुरू केले.

याबाबत माहिती देताना निवडणूक अधिकारी प्रवीण आष्टीकर म्हणाले, '800 मतदारांसाठी एक मतदान केंद्र असणार आहे. त्यामुळे एकूण 3200 मतदान केंद्र उभारावी लागणार आहेत. त्यासाठी 21 हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ही केंद्र उभारताना ती तळमजल्यावरच असावीत, अशा आयोगाच्या सूचना आहेत. त्यासाठी सोसायट्यांचे क्‍लब हाउस, ओपन स्पेस, समाजमंदिरे या ठिकाणीसुद्धा मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. जेथे लिफ्टची व्यवस्था आहे, अशाच ठिकाणी पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र उभारण्यात येतील. कामकाजाच्या पद्धतीत सुटसुटीतपणा येण्यासाठी आठ स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले असून प्रत्येक विभागाकडे स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. 14 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज विक्री आणि स्वीकृती करण्यात येणार आहे. त्यासाठी 14 निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांना अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ध्वनिफीत, चित्रफितीसह केबल अथवा दूरचित्रवाहिन्यांवर जाहिरात करण्यासाठी आयोगाकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. 14 क्षेत्रीय कार्यालये व्हिडिओ कॉन्फरसिंगने जोडण्यात आली आहे.''

- उमेदवाराची खर्चाची मर्यादा आता चार लाखांपर्यंत.
- आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष.
- प्रारूप मतदारांची संख्या 24 लाख 76 हजार.
- अर्जासोबत जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
- 14 क्षेत्रीय कार्यालयातच अर्ज विक्री आणि स्वीकृती.
- महापालिका राबविणार मतदान जनजागृती अभियान.
- मतमोजणीचा दिवस आयोगाशी चर्चा करून ठरविणार.

'एंड' बटनाची सोय
एकाच प्रभागात 15 पेक्षा कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यावर एकाच बॅलेट युनिटवर दोन्ही उमेदवारांना मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन बॅलेट युनिट राहतील. प्रभागातील एकाच उमेदवारास मतदान करावयाची सुविधाही बॅलेट युनिटवर असणार आहे. इतरांना मतदान करावयाचे नसेल तर बॅलेट युनिटवरील "एंड' बटन दाबून मतदारास आपली मतदान प्रकिया पूर्ण करण्याची सुविधा या यंत्रात आहे. मतदाराने ते बटन न दाबल्यास केंद्रप्रमुख सर्व कर्मचाऱ्यांसमोर "एंड' बटन दाबून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: