Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

वाहनांच्या तपासणीत "क्रॅश टेस्टिंग' व्हावे
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 04, 2012 AT 03:00 AM (IST)
Tags: arai,   vehicle,   krash testing,   pune
पुणे - "सध्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नवनवीन वाहनांच्या तपासणी यंत्रणेत "क्रॅश टेस्टिंग'साठी लक्ष दिले पाहिजे. त्या दृष्टीने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (एआरएआय) विशेष प्रयत्न चालू असल्याची माहिती संस्थेचे संचालक श्रीकांत मराठे यांनी दिली.
""अपघातात गाडीच्या वेगवेगळ्या बाजूंनी फटका बसल्यावर आतील चालक व इतरांना पोचणाऱ्या इजेची तीव्रता किती असेल, याचे संशोधन विविध सेन्सर्सच्या साह्याने "एआरएआय'मध्ये केले जात आहे. त्याचबरोबर गाडी धडकताना त्याच्या कुठल्या भागाला त्वरित हानी पोचते, हे अभ्यासण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या साह्याने त्याची छायाचित्रे घेतली जातात. अशाप्रकारे वाहनांची तपासणी करणारे देशातील ही एकमेव संस्था असून, सध्या चीन व कोरियामधील अनेक कंपनीच्या वाहनांची तपासणीही "एआरएआय'तर्फे चालू आहे. त्याचबरोबर वाहनातील आसनाची तपासणी "हुका रोबो' या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केली जाते,'' असेही मराठे यांनी सांगितले.

"एआरएआय'च्या प्रस्तावित प्रयोगशाळेबाबत ते म्हणाले, ""वाहनाची सर्व प्रकारे तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या प्रयोगशाळेची सर्व सामग्री आमच्याकडे तयार आहे; परंतु केवळ परवानगीअभावी हे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. प्रयोगशाळेमुळे कोणत्याही प्रकारची हानी पर्यावरणाला पोचणार नसून, परवानगी मिळाल्यास 18 महिन्यांत ही प्रयोगशाळा सुसज्ज होईल.''

"एआरएआय'मध्ये होणाऱ्या कामाबद्दल अनेकांना माहिती नाही. त्यामुळे ते सांगण्यासाठी वर्षातून दोनदा सर्वांसाठी संस्था खुली ठेवण्याचा विचार आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: