Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

आठवडाभर गाडी, नंतर पायी फिरा........

-
Tuesday, February 28, 2012 AT 03:00 AM (IST)

पुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या वाहनांकरिता दरमहा केवळ पंधरा लिटर पेट्रोल दिले जात आहे. एक आठवडाभर वाहन वापरा, नंतर दुचाकी किंवा पायी प्रवास करा, अशी वेळ उपाध्यक्षांवर आली आहे.

महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना चारचाकी वाहन दिले जाते. त्याचप्रमाणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षांनाही चारचाकी दिली जाते. उपाध्यक्षांकरिता "इंडिगो' हे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनांकरिता दरमहा केवळ पंधरा लिटर पेट्रोल पुरविले जाते. त्यापेक्षा अधिक पेट्रोलच मिळत नसल्याने इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणे या वाहनाचा वापर उपाध्यक्षांना करता येत नाही. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या नवीन कायद्यानुसार बोर्डाच्या प्रशासनाने हा बदल केला आहे. त्याचा फटका उपाध्यक्षांना बसत आहे, तसेच चालकही कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त उपलब्ध होत नाही.

जानेवारीत उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणारे शैलेश बीडकर म्हणाले, 'विविध कामानिमित्त बोर्डाच्या कार्यालयात दररोज जावे लागते. विविध संस्था, शाळा, सार्वजनिक मंडळे आयोजित कार्यक्रमांना उपाध्यक्ष या नात्याने हजेरी लावावी लागते. त्यामुळे वाहनाचा वापर जास्त होतो. तसेच बोर्डाच्या हद्दीबाहेरही नागरिकांच्या कामाकरिता जावे लागते; पण या प्रवासाकरिता पंधरा लिटर पेट्रोल पुरेसे नाही.''

""नियमानुसार पंधरा लिटरच पेट्रोल दिले जात असल्याचा दावा बोर्डाचे प्रशासन करीत आहे. मात्र, त्यांनी व्यवहार्यता तपासली पाहिजे. पंधरा लिटर पेट्रोलमध्ये कोणता पदाधिकारी महिनाभर वाहन वापरू शकतो का? आठ - दहा दिवस वाहन वापराचे, नंतर उपाध्यक्षांनी स्वतःची दुचाकी घेऊन फिरायचे? नाहीतर पायी जायचे का? पेट्रोलची मर्यादा वाढविण्याचा विचार बोर्डाने केला पाहिजे.'' अशी अपेक्षाही बीडकर यांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया
On 08/02/2013 05:50 AM sanjay said:
अरे बाबा पायी फिरल्याने च जनतेचे प्रोब्लेम तुम्हाला माहित होईल, व ग्लोबल वार्मिंग वाढणार नाही. जरा निसर्गाला समजून घ्या.
On 28/02/2012 07:00 PM Dhananjay Damle said:
या आणि अश्या भुक्कड निर्णयान मुळेच लाचखोरीला उत्तेजना मिळते.
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: