Woodsville,1BHK,2BHK,3BHK,ChakanRoad,Low Price
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

चर्चगेट-डहाणू लोकलसाठी रेल्वेमंत्री अनुकूल
- सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, April 27, 2012 AT 11:55 PM (IST)
मुंबई - पश्विम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू थेट लोकल सुरू करण्यास रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी दिली. मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती देताना ते बोलत होते.

राम नाईक यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांची दिल्ली येथे भेट घेऊन मुंबईतील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. 57 कोटी रुपये खर्च करून विरार-डहाणू रेल्वेमार्गाचे रुंदीकरण करण्यात आले असून, विद्युत प्रवाहही "डीसी'तून "एसी' करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर उपनगरीय गाड्या सुरू करण्यास अडचण नसल्याची बाब नाईक यांनी रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांच्या निदर्शनास आणली. यावर संबंधित मार्ग सुरू करण्यास रेल्वे मंत्रालय अनुकूल असल्याचे आश्‍वासन रॉय यांनी दिल्याची माहिती नाईक यांनी दिली. तसेच, रेल्वे अर्थसंकल्पादरम्यान प्रथम वर्गाचे वाढविलेले भाडेही कमी करण्याबाबत रॉय यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.

जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेची श्‍वेतप्रत्रिका काढली होती, त्याच धर्तीवर आता निर्णय घेतल्यास देशभरातील नव्या रेल्वे प्रकल्पाची जनतेला माहिती मिळेल, असे नाईक म्हणाले. मुंबईत दररोज 72 लाख उपनगरीय रेल्वे प्रवासी असल्याने ही संख्या विचारात घेता उपनगरीय रेल्वे मार्गावरील 9 डब्यांच्या लोकल 12 डब्यांच्या आणि 12 डब्यांच्या गाड्या 15 डब्यांच्या करण्याची मागणीही भाजपच्या शिष्टमंडळाने रॉय यांच्याकडे केल्याची माहिती राम नाईक यांनी दिली.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: