Woodsville,1BHK,2BHK,3BHK,ChakanRoad,Low Price
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

अहमदाबाद-मेंगलोर 'समर' स्पेशलच्या दहा फेऱ्या
-
Sunday, May 06, 2012 AT 03:30 AM (IST)

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्‍चिम रेल्वेने अहमदाबाद- मेंगलोर या नवीन गाडीच्या दहा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज पहिली फेरी अहमदाबादहून सुटली. समर स्पेशलच्या 182 फेऱ्यांचे कोकण रेल्वे मार्गावर नियोजन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली असून प्रत्येक गाडीला 300 ते 400 ची प्रतीक्षा यादी आहे. 1 मे रोजी विविध शाळांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उन्हाळी सुटीचा आनंद कोकणात साजरा करण्यासाठी चाकरमान्यांची पावले वळली आहेत. काही चाकरमानी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झाले आहेत; मात्र काहींनी मे महिन्याचाच आधार घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत कोकण रेल्वे हाऊसफुल्ल आहे. पश्‍चिम रेल्वे, मध्य रेल्वेने उन्हाळी सुटीसाठी 172 जादा फेऱ्यांचे नियोजन केले. त्याही गाड्या फुल्ल झाल्यामुळे नियमित धावणाऱ्या कोकणकन्या, दादर पॅसेंजर, दिवा-सावंतवाडी, राज्यराणी, मत्स्यगंधा, मांडवी, जनशताब्दी या गाड्यांवरील भार वाढू लागला आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्‍चिम रेल्वेने या मार्गावर अहमदाबाद-मेंगलोर ही नवीन समर स्पेशल गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी आज मेंगलोरला रवाना झाली.

ही गाडी आठवड्यातून दर शनिवारी धावणार आहे. ती दुपारी 4.15 वाजता अहमदाबादहून सुटेल, ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7.05 वाजता मेंगलोरला पोचेल. परतीचा प्रवास रविवारी मेंगलोरहून रात्री 11.05 वाजता सुरू होईल. ती गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 4.05 वाजता अहमदाबादला पोचेल. 5, 12, 19, 26 मे आणि 2 जून या दिवशी ही गाडी धावेल, तर तिचा परतीचा प्रवास 6, 13, 20, 27 मे आणि 3 जून या दिवशी सुरू होईल. ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर पनवेल, रोहा, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी येथे थांबेल. या गाडीला 24 डबे आहेत. यामध्ये 15 स्लीपर कोच, तीन एसी थ्री टायर, चार सर्वसाधारण, दोन एसएलआर अशी रचना आहे. कोकण रेल्वे मार्गावर एकूण 182 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: