Woodsville,1BHK,2BHK,3BHK,ChakanRoad,Low Price
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

म्हैसूर-पाटणा गाडीची 15 वेळा "चेनपुलिंग'
-
Tuesday, May 08, 2012 AT 10:40 PM (IST)
नागपूर - म्हैसूर-पाटणा हॉलीडे स्पेशल रेल्वेगाडीतील प्रवाशांना पाणी आणि जेवण न मिळाल्याने नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी थांबताच प्रवाशांनी तब्बल 15 वेळा चेनपुलिंग करून गोंधळ घातला. त्यामुळे स्थानकावर एकच खळबळ उडाली.

पाटणा येथून 3 मे रोजी म्हैसूर-पाटणा हॉलीडे स्पेशल ही रेल्वेगाडी म्हैसूरकडे रवाना झाली. रेल्वेगाडीत बंगळूर येथे होणाऱ्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या परीक्षेचे बहुतांश विद्यार्थी होते. परतीच्या प्रवासात ही रेल्वेगाडी कुठेच थांबविण्यात न आल्याने गाडीतील प्रवाशांपुढे पिण्याचे पाणी आणि जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येताच प्रवाशांनी गाडीतून उतरून मिळेल तेथून खाण्याचे पदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या विकत घेण्यासाठी धावपळ केली. यात ही गाडी पुढील प्रवासाला निघाल्यानंतर असंख्य विद्यार्थी तसेच इतर प्रवासी गाडीत पोहोचू शकले नसल्याने त्यांच्या सोबतच्या व्यक्तींनी "चेनपुलिंग' करून गाडी थांबविली. तब्बल 15 वेळा या गाडीची चेनपुलिंग करण्यात आली. यातच रेल्वेगाडीतील पाणी संपल्यावर नागपूर रेल्वेस्थानकावर अर्धा तास या गाडीला पाणी देण्यात आले नाही. या धावपळीत ही रेल्वेगाडी तब्बल 40 मिनिटे रेल्वेस्थानकावर उभी राहिली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी येऊन सर्व प्रवाशांना आत बसविल्यानंतर दुपारी 4 ला ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: