Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

नांदेड 'सकाळ'च्या वर्धापनदिनाला शुभेच्छांचा वर्षाव
-
Saturday, August 25, 2012 AT 03:45 AM (IST)

नांदेड - 'सकाळ'च्या नांदेड विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनाला गुरुवारी (ता. 23) नांदेडकरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पान-सुपारीच्या सोहळ्यासह "देस मेरा रंगीला' या सांस्कृतिक कार्यक्रमालाही हितचिंतक, चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. अंध विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनालाही नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने "सकाळ माध्यम समूहा'ने व्हीआयपी मार्गावरील कुसुम सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. सभागृहालगत उभारण्यात आलेल्या आकर्षक मंडपात शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, वाचक, जाहिरातदार, एजंट बांधवांनी गर्दी केली होती. वर्धापनदिनानिमित्त "सकाळ'ने प्रकाशित केलेल्या सर्वसमावेशक विशेषांकाचे या वेळी उपस्थित हितचिंतकांनी कौतुक केले. कंधार तालुक्‍यातील हितचिंतकांनी या वेळी कंधारच्या राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ल्याची प्रतिमा "सकाळ'ला भेट दिली. त्याचे अनावरण आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

"सकाळ'तर्फे उपसरव्यवस्थापक महावीर देवसाळे, सहयोगी संपादक संजय कुलकर्णी, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) हरीश हिंगणे, व्यवस्थापक (वितरण) विवेक हिंगोलीकर, व्यवस्थापक (जाहिरात) संतोष जळके, व्यवस्थापक (इव्हेंट) संदीप देऊळगावकर, सहायक व्यवस्थापक (जाहिरात) विलास कुलकर्णी आणि नांदेड विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. वर्धापनदिनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणाऱ्या मान्यवरांत आमदार शंकरअण्णा धोंडगे, आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार गंगाराम पटणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, महापौर अजयसिंह बिसेन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड, जिल्हाधिकारी धीरजकुमार, महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक विठ्ठलराव जाधव, उपमहापौर शमीम अब्दुल्ला, कवी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम गगरानी, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी जगदीश मिनियार, पोलिस उपअधीक्षक (गृह) प्रदीप बाबर, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी, अमोल झेंडे, तहसीलदार डॉ. अरविंद नरसीकर, पोलिस निरीक्षक श्रीरंग निम्मनवाड, नागनाथ कोडे, संजय देशमुख, धरमसिंग चव्हाण, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव सदाशिवराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव टी. ए. कदम, परीक्षा नियंत्रक डॉ. वसंत भोसले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक प्राचार्य आत्माराम टेंगसे, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, सहायक वनसंरक्षक कामाजी पवार यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.

शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या अन्य शेकडो मान्यवरांत जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे, लायन्स क्‍लबचे अध्यक्ष राजेंद्र हुरणे, उद्योजक विनोद बाहेती, अश्‍विनी हॉस्पिटलचे डॉ. गजानन चौधरी, डॉ. रवींद्र बिलोलीकर, चौगुले कोचिंग क्‍लासेसतर्फे दशरथ पाटील, आर. के. बिल्डर्सचे बलभीम रेणापूरकर, अभिजित रेणापूरकर, साई एलीगंजचे नंदकिशोर सुलताने, डॉ. श्‍याम तेलंग, डॉ. नरेश रायेवार, प्राचार्य डॉ. एन. व्ही. कल्याणकर, प्रा. किरण देशमुख, प्रा. उपेंद्र कुलकर्णी, प्रा. शंभुनाथ कहाळेकर, प्रा. डॉ. जगदीश कदम, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, विनायक एकबोटे, प्रा. तसनिम पटेल, रामनारायण बंग, धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर, उपसभापती राम पाटील बन्नाळीकर, नगराध्यक्ष विनायकराव कुळकर्णी, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकर, उपनगराध्यक्ष शंकर पाटील बाळापूरकर, माजी नगराध्यक्ष विश्‍वनाथ पाटील बन्नाळीकर, प्राचार्य डॉ. दिगंबरराव मोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य दिलीप धोंडगे, कॉंग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, मुख्याधिकारी राहुल वाघ, उपनगराध्यक्ष बंदेअली पठाण, नांदेड महापालिकेचे विरोधी पक्षनेता महेश खोमणे, उपकुलसचिव आणि सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव संतुक हंबर्डे, विद्यापीठाचे उपवित्त लेखाधिकारी जी. बी. कतलाकुटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कदम, मुक्‍टाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तम सूर्यवंशी, टेक्‍सकॉमचे माजी अध्यक्ष गणपतराव राऊत, पद्मजा सिटीचे अविनाश जाधव, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे प्राचार्य तुकाराम इंगोले, राजेंद्र डोंगरे, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव संभाजी बिरादार, प्रकाश जाधव, वृत्तपत्रविक्रेते संघटनेचे बालाजी पवार, चेतन चौधरी, चंद्रकांत घाटोळ, श्री. वाकोडे पाटील, मुंडे कोचिंग क्‍लासेसचे व्यवस्थापक श्री. केंद्रे, महात्मा गांधी मिशनचे गोविंद हंबर्डे, ग्रामीण तंत्रनिकेतनचे श्री. आळंदकर, महिंद्रा फायनान्सकडून सचिन शिरडकर, हेमंत सुजलेगावकर, सतीश कुलकर्णी, कल्पना डोंगळीकर, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, कापूस संशोधन केंद्रातील संशोधक डॉ. पी. आर. झंवर, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे प्रा. देविकांत देशमुख, प्रा. ए. डी. पांडागळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्‍टर, प्राध्यापक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, कार्यकर्ते आदींनी "सकाळ'वर अभिनंदनाचा वर्षाव केला.

अंध मुलांच्या हस्तकसबाचे कौतुक
"सकाळ'च्या नांदेड विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हिंगोलीच्या मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गृहोपयोगी व सुशोभीकरणाच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला असंख्य मान्यवरांनी भेट दिली. चिमुकले विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक वस्तूंबद्दल माहिती देत होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्वच मान्यवरांनी या विद्यार्थ्यांच्या हस्तकसबाचे कौतुक केले. मुख्याध्यापक नंदकिशोर भालेराव, कलाशिक्षक किसन टेमकर, जितेंद्र शेंडगे, मुरलीधर सुरोसे, संगीत शिक्षिका सुनीता येळेगावकर, डी. एल. गव्हाणे, आशिष टिंगळकर, संदीप खुडे आदी विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते. तर प्रदर्शनाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सेवक दिलीप मुदीराज आणि प्रकाश वजीर यांनी यांनी सांभाळली.

'मधुरांगण'च्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
"सकाळ-मधुरांगण'च्या वतीने महिलांसाठी एका निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. "संवादाची बदलती माध्यमं व नात्यांमधील अंतर' या विषयांवर निबंध मागविण्यात आले होते. विवेकवर्धिनी अध्यापक महाविद्यालयाने ही स्पर्धा प्रायोजित केली होती. प्राचार्य सु. ग. जाधव हे या स्पर्धेचे परीक्षक होते. यात विभा जोशी (प्रथम), संगीता घाणेकर (द्वितीय) आणि सिंधू तिडके (तृतीय) या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आयएनजी इन्शुरन्सतर्फे वृक्षभेट
वर्धापनदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवत आयएनजी इन्शुरन्स कंपनीने शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सुमारे एक हजार हितचिंतकांना विविध जातींच्या झाडांची रोपे भेट दिली. वरिष्ठ शाखा व्यवस्थापक सुधीर देऊळगावकर, गटविपणन व्यवस्थापक अनंत बार्शीकर, बालाजी डुब्बेवार, वरिष्ठ विपणन व्यवस्थापक आनंद साधू, व्यवस्थापक ऋषीकेश देशपांडे, भरत चौहान, मनोज सावळकर आणि जनसंपर्क अधिकारी मंगेश हुगे यांनी पुढाकार घेतला.

संस्कृती संवर्धन मंडळाच्या शुभेच्छा
सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने "सकाळ'च्या नांदेड विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठविण्यात आला. त्यात म्हटले आहे, की "सकाळ'च्या वर्धापन दिनानिमित्त संस्कृती संवर्धन मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा ! येणाऱ्या काळात दैनिक सकाळ अधिकाधिक लोकाभिमुख होत जाईल. ते केवळ एक वृत्तपत्र नाही तर समाजाच्या प्रश्‍नाचे, मानसिकतेचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. विद्यार्थी तथा शिक्षक यांच्यासाठी ते एक माहितीपूर्ण संसाधन आहे. शेतकरी वर्गासाठी तो जिवाभावाचा, प्रसंगी लढा देणारा साथीदार आहे. महिला आणि ग्रामीण युवकांसाठी मार्गदर्शक आहे. समाजात घडणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टींची "सकाळ'ने नेहमीच दखल घेतली आहे. या समाजाच्या आरशाला पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !!
प्रतिक्रिया
On 25/08/2012 03:08 PM A.R.Yermalkar said:
दैनिक सकाळ'च्या वर्धापन दिनानिमित्त आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: