Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

लताबाई, किती खोटे बोलणार?
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 30, 2012 AT 01:15 AM (IST)
कोल्हापूर - चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्यावरील प्रेमापोटी ज्येष्ठ निर्माते दादा कोंडके लता मंगेशकरांना जयप्रभा स्टुडिओसाठी योग्य किंमत देण्यास तयार होते. मात्र, मंगेशकरांनी नकार दिला होता. भालजी पेंढारकर असो किंवा मराठी सिनेसृष्टी आणि कोल्हापूरशी कधीच त्यांना जिव्हाळा वाटला नसल्यानेच त्या धादांत खोटे बोलून आपल्या भूमिकेचे समर्थन करत आहेत, असा आरोप आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने केला आहे.

लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओ विक्रीबाबतची भूमिका मांडताना चित्रपट महामंडळ निष्क्रिय असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय महामंडळाला स्टुडिओ चालवायला घेण्याची विनंती केली होती; पण महामंडळाने ती जबाबदारी स्वीकारली नसून "स्टुडिओ माझा, मी विकणारच' अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर महामंडळाने आज तातडीची बैठक घेऊन त्यांच्या या भूमिकेचा निषेध करताना "स्टुडिओ आमचा - आम्ही लढणारच' असा प्रतिटोला लगावला आहे. महामंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की लताबाईंनी महामंडळाला स्वतःहून कधीच स्टुडिओबाबत चर्चेसाठी बोलावले नाही. उलट, महामंडळाने अनेकदा त्यांच्याशी लेखी पत्रांद्वारे संपर्क साधला तरी त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. महामंडळ निष्क्रिय असल्याचे म्हणताना त्या त्यांचे गुरू भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, सुधीर फडके यांचाही अपमान करतात. जयप्रभा स्टुडिओ चालत नाही, म्हणून विकत असल्याचा खुलासा त्या करीत असल्या तरी त्यांनी स्टुडिओ घेतल्यापासून कोणत्याही प्रकारच्या नव्या सुविधा आजवर दिल्या नाहीत. स्टुडिओच्या परिसरातील जागा विकल्यानंतर मिळालेल्या रकमेतील एक-दोन टक्के रक्कम जरी त्यांनी स्टुडिओसाठी खर्ची घातली असती, तर स्टुडिओत चांगल्या सुविधा देता आल्या असत्या. मुळात त्यांना स्टुडिओ चालवायचाच नव्हता. त्याची विक्री करून केवळ पैसा मिळवायचा होता. मात्र, आम्ही कायदेशीर मार्गाने लढू आणि स्टुडिओ मिळवूच.''

वाडकर माफी मागा अन्यथा पाय ठेवू देणार नाही
जयप्रभा स्टुडिओ विक्री व्यवहाराबाबत भूमिका मांडताना ज्येष्ठ पार्श्‍वगायक सुरेश वाडकर यांनी आंदोलन करणाऱ्यांना काही काम नाही, अशी टीका केली आहे. त्यांनी माफी मागावी अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेने दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोल्हापूरकरांनी हा स्टुडिओ पूर्वी जाळल्याचा इतिहास आहे; पण त्यालाही कारण तसेच होते. भालजी पेंढारकरांनी सुरेश वाडकरांसारख्या अनेक कलाकारांना घडवले. मात्र, त्याची त्यांना कशी जाण असेल? या पत्रकांवर बाबा महाडिक, संपत पाटील, शाहू जाधव, सचिन पाटील, अनिल भोसले, अभी चौगले आदींच्या सह्या आहेत.
प्रतिक्रिया
On 01/09/2012 06:10 PM kiran vinayak yadav said:
Chitrapat Mahamandal STUDIO viklyanantar jage jhale aadhi mahamandal kortat ka gele nahi? Latadidina jovar sambhalta aala tovar tyani studio sambhalala aata tyana jababdaritun mokle vhayche asel tar tyat gair te kay? Mahamandalatalya gidhadana studio chalvaycha hi nahi fakta paise khayche aahet aani Didinsarkhya Nishkalank Vyaktibaddal ase boltana tyani vichar karayla hawa? Karan itki pavitra ,Nirvayj kala Dev Devasarkhyach Mansala Deto tynchi etaranshi tulna houch shakat Nahi....
On 31/08/2012 12:43 AM sachind said:
कलेच्या जोरावर पैसा मिळवला आता लोकांच्या भावनेच्या जोरावर अजून पैसा मिळवतील. वाड वडिलांच्या नावे हॉस्पिटल बांधतील अजून पैसे कामाल्वाला. सरकार आणि लोक आहेत मूर्ख बनण्यासाठी. आधीच महाराष्ट्रामध्ये पुरातन वास्तू सांभाळण्याची अक्कल नाही. कदाचित त्यांना तो स्तुदिओ विकून तिथे अनेक पडदा सिनेमागृह बांधायचे दिसते.
On 30/08/2012 10:51 PM umesh said:
धीरूभाई अंबानी वारले तेव्हा ६५ हजार कोटीचे साम्राज्य मागे होते त्यातील एक पैसाही त्यांना आपल्याबरोबर नेता आला नाही लता दिदिंनीही हे लक्षात ठेवावे बाकी सुरेश वाद्कारांकडे तरी जयप्रभाची दलाली करण्य्शिवाय दुसरे काय काम आहे
On 30/08/2012 09:02 PM Dr. Shirish Chavan said:
या जागेचे मालक कोण आहे? लता मंगेशकर कि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ? आणि मंगेशकर यांनी संपत्ती कमावली असेन तर ती त्यांच्या कष्टातून आणि कलेतून. दान karaichi कि नाही हे आपण कोण सांगणार? फार जागेवर प्रेम असेल तर पैसे खर्चून विकत घ्यावी किंवा नाद सोडून द्यावा.
On 30/08/2012 05:54 PM Dr. Shirish Chavan said:
या जागेचे मालक कोण आहे? लता मंगेशकर कि जयप्रभा studio ? आणि मंगेशकर यांनी संपत्ती कमावली असेन तर ती त्यांच्या कष्टातून आणि कलेतून. दान karaichi कि नाही हे आपण कोण सांगणार? फार जागेवर प्रेम असेल तर पैसे खर्चून विकत घ्यावी किंवा नाद सोडून द्यावा.
On 30/08/2012 04:04 PM prasanna said:
"आम्ही कायदेशीर मार्गाने लढू आणि स्टुडिओ मिळवूच"...जगातल्या कुठल्याही कोर्टात तुमचा दावा टिकणार नाही...
On 30/08/2012 03:20 PM Nitin said:
Builder lobbying?
On 30-08-2012 01:11 PM HHB said:
लता मंगेशकर योग्य तेच करत आहेत. कुरुपाया त्यांची बाजू पण मांडा..
On 30/08/2012 12:53 PM supriya said:
हे मंगेशकर कुटुंब महाराष्ट्रात मोठे झाले सगळ्यानी खूप माया गोळा केली, आणि या महाराष्ट्राला एक स्तुदिओ दिला तर काय बिघडणार आहे यांचे. मंगेशकर हॉस्पिटल बांधले आहे किती गरिबांवर तिथे उपचार होतो आहे हे पण पहा. मोक्याची जागा मिळवली आहे आणि पैसे कमावत आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: