Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

एसटी भरतीची 14, 21 ऑक्‍टोबरला परीक्षा
-
Thursday, October 11, 2012 AT 02:45 AM (IST)
रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) भरती प्रक्रिया 2012 अंतर्गत सहाय्यक, लिपिक आणि चालक या पदांकरीता 14 ऑक्‍टोबर आणि वाहक पदासाठी 21 ऑक्‍टोबरला परीक्षा घेण्यात येणार आहे. एसटी भरती प्रक्रिया परीक्षा अंतर्गत 14 ऑक्‍टोबरला होणारी परीक्षा ही रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल, फाटक हायस्कूल आणि एम. एस. नाईक हायस्कूल या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. 21 ऑक्‍टोबरची परीक्षा रत्नागिरीतील पटवर्धन हायकूल, एम. एस. नाईक आणि मिस्त्री हायस्कूल येथे होणार आहे. 14 ऑक्‍टोबरला घेण्यात येणाऱ्या परीक्षेची हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली असून httpः//msrtc.mkcl.org या संकोतस्थळावरून हॉलतिकिटे डाऊनलोड करता येणार आहेत. या सुविधेचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपली हॉलतिकिटे डाऊनलोड करून घ्यावीत, असे आवाहन "एमकेसीएल'तर्फे करण्यात आले आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: