Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

पुण्यात तीन लाख दुचाकी वाढल्या

- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 08, 2013 AT 12:45 AM (IST)
Tags: vehicle,   rto,   pune
पुणे - खासगी वाहनांच्या वाढीचा वेग शहरात मोठा असून गेल्या वर्षात तब्बल तीन लाख दुचाकींची, तर एकूण संख्येत चार लाखांहून अधिक वाहनांची भर पडली आहे. वाहनांच्या संख्येच्या वाढीचा हाच वेग कायम राहिला, तर येत्या वर्षातही चार लाखांहून अधिक वाहनांची भर पडेल, असा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) अंदाज आहे.

शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नुकतीच चिंता व्यक्त केली. खासगी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे कोंडीबरोबरच वाहतुकीचा वेगही कमी होत आहे. तसेच वाहनतळही अपुरे पडत आहेत. यातूनच प्रदूषणाचाही प्रश्‍न निर्माण होत आहे. याबाबत "आरटीओ'कडील नोंदीचा आढावा घेतल्यास केवळ पुणे शहर नव्हे, तर पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातही वाहनांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक वाढीचा वेग पुणे शहरात आहे. वाहनांच्या एकूण प्रकारात दुचाकी व चारचाकी विशेषतः मोटारींची वाढ होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे स्वत:च्या वाहनावर अवलंबून राहण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे ही संख्या वाढत असल्याचे "आरटीओ'तील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वाहनांच्या संख्येच्या वाढीचा वेग लक्षात घेता सध्या दरमहा सरासरी 25 हजार 942 वाहनांची भर पडत आहे. त्यामुळे वर्षाखेरीस तीन लाखांहून अधिक वाहनांची शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात भर पडणार आहे.

दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2002 मध्ये शहरात दुचाकी वाहनांची संख्या सुमारे सात लाख, तर एकूण वाहनांची संख्या पावणेदहा लाख होती. आज दुचाकी वाहनांची संख्या 18 लाखांहून अधिक, तर एकूण वाहनांची संख्या 24 लाखांहून अधिक झाली आहे.

शालेय बस वाढल्या
दुचाकी, मोटारी, रिक्षांपाठोपाठ शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 31 मार्च 2011 अखेर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस अवघ्या 1 हजार 681 होत्या. मात्र, गेल्या दीड वर्षात त्यांची संख्या झपाट्याने वाढून आता दहा हजार 203 बसगाड्या झाल्या आहेत. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते.

-----------------------31 मार्च 1996--------------- 31 मार्च 2009 अखेर ------------------- 31 डिसेंबर 2012 अखेर
- दुचाकी वाहने ----------3 लाख 86 हजार 971---------13 लाख 12 हजार 213 --------------- 18 लाख 16 हजार 889
- अन्य सर्व वाहने --------5 लाख 25 हजार 337--------17 लाख 62 हजार 730 ----------------- 24 लाख 20 हजार 95
- विद्यार्थी वाहतूक बस -----61-------------------------------422-------------------------------- 10 हजार 203
प्रतिक्रिया
On 08-01-2013 07:06 PM Vartak M. S. said:
PMPML जोपर्यंत सक्षम होणार नाही वगैरे गप्पा आता बास झाल्या. चांगली वाहतूक व्यवस्था पुरवणाऱ्या ३-४ खासगी कंपन्यांना परवानगी व थोड्या सवलती द्या. जो वर PMC व PCMC च्या भिकेवर चालणारी कंपनी असे PMPML चे रूप राहील तोवर हे राजकारणी ढवळाढवळ करतच राहणार. आज त्यांच्या PMPML च्या मालकीच्या बसेस घेवून खासगी चालक नफा कमावतात. कारण उघड आहे.जेंव्हा ६ सीटर रिक्षा गावातून लांबवर बसच्या दरात प्रवासी नेत तेंव्हा रिक्षावाले दाबून होते. त्यांना बंद केल्या वर त्रास सुरु झाला. वाहन घेणे आज काळ सोपे झाले आहे व नोकरदारांची पत वाढली आहे. हे दुसरे कारण. शेवटी एक वेळ अशी येणार आहे कि रस्ते इतके भरून जातील कि वाहने चलने अशक्य होईल. पुण्यातून मोठ्या प्रमाणावर भांडवल बाहेर गेले तर व आमच्या सारखे निवृत्त लोक बाहेर गेले तर उरलेले सुखाने जगातील.
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: