Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने गैरसोय

- सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 13, 2013 AT 01:00 AM (IST)
सिंधुदुर्गनगरी- जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारीपदे गेली पाच वर्षे रिकामी असल्याने सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत आहे; मात्र याकडे शासन आणि येथील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात गेली पाच वर्षे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आलेली नाहीत. ही पदे भरण्यासाठी नावे निश्‍चित करून पोलिस ठाण्याकडून यांची चौकशी करण्यात आली. ही यादी शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आली; मात्र अद्याप याला मान्यता देण्याबाबत विचार झालेला नाही. त्यामुळे येथील जनतेची व शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. 

विविध नोकऱ्या व अन्य कामांसाठी दाखल्याची सत्यप्रत करण्यासाठी सर्वसामान्यांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. सत्यप्रत करण्यासाठी बऱ्याचदा मुख्याध्यापक, जिल्हा परिषद सदस्य व अन्य अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही. तरीही गावोगावी नियुक्त करण्यात येणारी पदे तत्काळ भरावीत व जनतेची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. 
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: