Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

मार्ग एक, मग वाहने का अनेक? चला, कार शेअर करू

-
Tuesday, January 15, 2013 AT 05:00 AM (IST)
Tags: vehicle,   car share,   pune


कार पूल अड्डा मोबाईल ऍप्लिकेशन
 
पुणे - कॉलेजच्या दिवसात 'बाईक'चा खर्च भागविण्यासाठी 'पेट्रोल पार्टनर' शोधण्याचा खटाटोप आठवतोय? कॉलेजमधल्या याच संकल्पनेचा आधार घेत आता मोटारीतून ऑफिसला जाणाऱ्या, विशेषतः आयटी क्षेत्रातल्या प्रोफेशनल्सकरिता "कार पूल अड्डा' हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. गुगलच्या अँड्रॉईड, ऍपल, तसेच विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे हे ऍप प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने लॉंच होणार आहे.

"सकाळ'ने राबविलेल्या "पुणे बस डे' उपक्रमातून प्रेरणा घेत नितीन पाटील, संजय चव्हाण, तपस रथ आणि हेमंत सेनगर या चौघा आयटी प्रोफेशनल्सनी ही योजना तयार केली आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या दहा टक्के व्यक्तींनी जरी ही योजना स्वीकारली, तरी हिंजवडीसारख्या भागात सुमारे तीस हजार चारचाकी वाहने रस्त्यावर येणार नाहीत, अशी अपेक्षा पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

काय आहे योजना
प्रवासादरम्यान आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांना, विशेषतः महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. "कार पूल अड्डा'च्या उपक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने संकेतस्थळावर किंवा ऍपद्वारे स्वतःची नोंदणी करावी लागते. त्यासाठी संबंधित व्यक्तीच्या कार्यालयीन ई-मेल आयडीवर फक्त एकदाच वापरण्यात येणारा असा विशिष्ट पासवर्ड (ओटीपी) पाठविण्यात येतो. या पद्धतीमुळे प्रत्येक व्यक्तीचे "व्हेरिफिकेशन' आपोआपच होते. स्वतःचे खाते तयार केल्यानंतर त्यामध्ये पेमेंट गेटवेच्या माध्यमातून किमान शंभर रुपयांचे (100 पॉईंट्‌स) रिचार्ज करावे लागते, असे त्यांनी सांगितले. पार्टनर निवडण्याचे स्वातंत्र्य कार मालक आणि सहप्रवासी या दोघांनाही असते. प्रवासाच्या सुरवातीलाच कारमालक आणि सहप्रवासी यांच्याकडून या पासवर्डमार्फत परस्परांची खातरजमा करण्यात येते. सहप्रवासी शोधण्याचा (ऑफर ए राईड) किंवा बनण्याचा (नीड ए राईड) पर्याय नोंदणी झालेल्या व्यक्तीला देण्यात येतो. त्यानंतर प्रवासाला कोठून व किती वाजता सुरवात करणार आहे, तसेच कोणत्या ठिकाणी जायचे आहे. त्याची माहिती प्रत्येकाला भरावी लागते. त्यानंतर कार पूल अड्डाच्या विशेष "सर्च' पद्धतीने सहप्रवासी निवडण्याचे सर्वोत्तम पर्याय प्रत्येकाला देण्यात येतात. दोन्ही व्यक्तींकडून होकार मिळाल्यानंतरच पुढील माहिती संबंधितांना देण्यात येते.

सहप्रवासी बनणाऱ्या व्यक्तीला विशिष्ट असा "कार पूल कोड' पाठविण्यात येतो. हा कोड सहप्रवाशाने सांगितल्यानंतर संबंधित कार मालकाला तो त्याच्या मोबाईल ऍपवर भरावा लागतो. ही माहिती भरल्यानंतरच सहप्रवाशाच्या खात्यातून कार मालकाच्या खात्यात पैसे जमा होतात.
 
असे व्हा सदस्य
गुगल प्ले, ऍपल स्टोरमधून किंवा संकेतस्थळावरून "कार पूल अड्डा'चे ऍप डाऊनलोड करा
कार पूल अड्डावर स्वतःची नोंदणी करा
ऍप वापरता येण्यासाठी कॉर्पोरेट ई-मेल आयडीद्वारे "व्हेरिफिकेशन' पूर्ण करा
ऍपवर दिलेल्या सूचनांप्रमाणे सहप्रवासी बना किंवा शोधा
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: